DGS लाइफ केअर फाउंडेशन व माहिती अधिकार महासंघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
शहापुर (देविदास भोईर) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व डी DGS लाईफ केअर फाउंडेशन यांच्या वतीने मौजे बोर शेती येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाला. शिबिराचे आयोजन अविनाश वेखंडे, महेश कशिवले, सुधीर भागरे, यांनी केले असून उद्घाटन वैद्यकिय अधिकारी शेडगे (PHC शेंद्रुन) व प्रकाशजी वेखंडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले.
तपासणी शिबीर आयोजित करण्यास श्री साईधाम हॉस्पिटल मानकोली व विमला हॉस्पिटल डॉ. अनुप मिश्रा यांचे विशेष सहकार्य लाभले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास भेटी दिल्या शिबिरांमध्ये एकूण 147 रुग्णांची तपासणी केली असून विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आले. यावेळी रामचंद्र देसले, देवकांत वेखंडे, हरेश वेखंडे, संदेश वेखंडे, गुरूनाथ वेखंडे, मंगेश भडांगे, महेंद्र जाधव, अविनाश किरपण, सुनील भागरे, वसंत भागरे, काळूराम भागरे, कृष्णा खुटले, विष्णू तरमले, रमेश निचीते, सुनिल धलपे, गोविंद भोईर, अतुल तेलवणे, सुभाष विशे, अभय जाधव, सचिन शेलवले, अंकिता गोष्टे, देविदास भोईर, प्रमोद जाधव उपस्थित होते.