वैभव मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासद न्यायासाठी बसले मनपाच्या दारात
लातूर : मनपा इंजिनियर प्रेमनाथ घंटे यांनी नियोजित ठिकाणी कमाण न करता वैभव मागासवर्गीय संस्थेच्या जागेत भ्रष्टाचार करत बेकायदेशीर कमाण केल्याने यांना त्वरित बडतर्फ करावे. कमानीचे होत असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरित बंद करावे यासाठी वैभव मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासद न्यायासाठी मनपाच्या दारात बसले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा वैभव सोसायटी च्या सभासदांनी आज दिला आहे.
वैभव मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थां मर्या. लातूर या संस्थेची नोंदणी दिनांक 30 – 3 – 1970 रोजी झाली आहे. या संस्थेच्या नावाने दोन एकर जागा देण्यात आलेली आसताना न्यायालयाचे तीन निकाल वैभव सोसायटीच्या बाजूने दिल्या आहेत. तसेच वैभव गृहनिर्माण संस्थेच्या येथील इतर कोणीही जागेत हस्तक्षेप करू नये असे निवेदन आज गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाने मनपा आयुक्तांना दिले आहे.
न्यायालयाचा निकाल निर्णय संस्थेच्या हक्कात आहेत..प्रशासक तथा आयुक्त लातूर शहर मनपा यांनाही बंधनकारक असून न्यायालयाच्या आदेशाच्या निर्णयाचे उल्लंघन करत या सोसायटीत कमान बांधण्याचा निर्णय घेत अवमान करत आहेत. वैभव सोसायटीच्या कमानी संदर्भात कसल्याही प्रकारची मागणी नसताना या सोसायटीत बेकायदेशीर कमानीचे बांधकाम मनपा ने चालू केले आहे. यात होत असलेल्या कमानीचे बधकामाबाबत निवेदन एक महिना अगोदर पासून जिल्हाधिकारी, आयुक्त यांना दिले असतानाही याठिकाणी हे सुवर्ण लोक मागासवर्गीयावर जाणून-बुजून अन्याय करीत आहेत.
त्यामुळे न्यायासाठी वैभव मागासवर्गीय सहकारी संस्थेचे सर्व सभासद महानगरपालिकेच्या दारात आजपासून आमरण उपोषण करीत असून न्यायालयाच्या निकालाचा मनपाने विचार करावा.
वैभव मागासवर्गीय संस्थेच्या जागेत होत असलेले कमानीचे बांधकाम त्वरित बंद करून न्याय द्यावा. अन्यथा वैभव मागासवर्गीय सहकारी संस्थेचे सभासद आमरण उपोषण सोडणार नाही. असेही मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.