महाराष्ट्र
लक्षचंडी यागामुळे भाविकांना सेवा करण्याची संधी – प.पु.गुरुमाउली अण्णासाहेब मोरे
धुळे (स्वप्नील मराठे) कोरोना, लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनाला बंधने निर्माण झाली होती. मात्र, आता शासनाचे नियम पाळून आपल्याला सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे, असे प्रतिपादन दिंडोरी येथील प.पु.गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी येथे केले.
येथील आदिशक्ती श्री एकवीरा देवी मंदिरात एकवीरा देवीचा नवीन पितळी स्थाचे पूजन सोहळा गुरुमाउलींच्या हस्ते झाला, त्यावेळी भाविकांशी हितगुज करताना ते बोलत होते. यावेळी श्री एकवीरा मंदिर देवी ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव, माजी महापौर भगवान करनकाळ, गोपाळ केले. श्रीस्वामी सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.