महाराष्ट्रराजकीय
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा धुळे दौरा संपन्न.
धुळे:- दि.१३ जुलै २०२२: प्रतिनिध-प्रदीप गोसावी
दि. १० जुलै धुळे शहरातील योग विद्या धाम, देवपूर धुळे संचलित शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्रातर्फे आयोजित केलेल्या ‘गुरुपौर्णिमा’ कार्यक्रमास आज नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब यांनी धुळे येथे सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात निवड झाल्याबद्दल योगगुरू यांचा सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापूसाहेब महाले, सचिन भदाणे, माणिकराव पानगव्हाणे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, नेरपगार सर, नाशिक पदवीधर मतदार संघाचे धुळ्याचे जनसंपर्क अधिकारी निलेश काटे आदी मान्यवर यांच्यासह योगसाधना करणारे बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते