राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपस्थित हिंदी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी हिंदीमधून प्रतिक्रिया देण्याची विनंती करताच राज ठाकरेंनी त्यांचीच फिरकी घेतली. “माझं हिंदी एवढं चांगलं नाही रे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेनं आजपासून सुरू केलेल्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. “दिवसभर जी काही चार-पाच वेळा बांग दिली जाते, त्यांची प्रार्थना म्हणतात ती जर परत त्यांनी दिली तर आमचे लोक त्या त्या वेळा हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये ४५ ते ५५ डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना ३६५ दिवस परवानगी देता ती कशासाठी? ४५ ते ५५ डेसिबल म्हणजे आमच्या घरचे मिक्सर जेवढे वाजतात तेवढा आवाज”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंना यावेळी उपस्थित हिंदी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी हिंदीमधून प्रतिक्रिया देण्याची विनंती करताच राज ठाकरेंनी त्यांचीच फिरकी घेतली. “माझं हिंदी एवढं चांगलं नाही रे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र, आपल्या मिश्किल स्वभावानुसार त्यांनी नकलेच्या शैलीमध्ये प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
मनसेच्या कार्यकर्त्यांची आज सकाळपासून अनेक ठिकाणी पोलिसांनी धरपकड केल्याच्या मुद्द्याविषयी बोलताना “हमारे कार्यकर्ता का धरपकड्या जो चल रहा है..” एवढं म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी हिंदीमधून सविस्तर प्रतिक्रिया दिली.