महाराष्ट्र
जिल्हाध्यक्षपदी पी. एन. पाटील यांची निवड
धुळे (प्रतिनिधी) मराठा सेवा संघाच्या वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी पी. एन. पाटील यांची नियुक्ती झाली. या वेळी गंगाधर बनबरे, संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, वधूवर सूचक मंडळाचे राज्याध्यक्ष बी. टी. देवरे यांनी पी. एन. पाटील यांची निवड केली. प्रत्येक गावात वधूवर सूचक मंडळाची शाखा सुरू करण्याचा संकल्प झाला. तालुकास्तरावर वधूवर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे.