आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
पहुरजिरा येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य शिबीर संपन्न
शेगाव (राजेंद्र मुंडे) तालुक्यातील पहुरजिरा येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत निलेश देशमुख मित्र परिवार व गणेश सडतकार, पवन चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला डॉ प्रशांत शंखपाल व त्यांची सर्व टिम यावेळी उपस्थित होती. शिबीराचे उदघाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश देशमुख, किसना पारस्कार, रोशन देशमुख, गोपाल भिसे, शोहेब शेख, अक्षय गावंडे, आकाश खडांरे, प्रदिप पहुरकर, रोहन गावंडे, विशाल पहुरकर, वैभव खारोडे व मोठ्या संख्येने गावकर्यांनी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.