वजन माप टेस्टिंग साठीच्या अवास्तव फी आकारणीबाबत तळोदा तहसीलदार यांना निवेदन
तळोदा (प्रतिनिधी) दि.२१ मार्च वार सोमवार रोजी महाराष्ट्र राज्य पंचायत शाखा तळोदा जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने तहसीलदार तळोदा यांना निवेदन सादर करण्यात आले.
यात अनेक व्यवसाय करणारे व्यापारी यांच्याकडे वजन काटे असतात. त्यांना ग्राहकांना सामानाची मोजदाद करण्यासाठी वजन काट्यांची गरज नियमित लागत असते. अशा वजनकाट्यांचे शासनाद्वारे अधिकृत एजन्सीमार्फत वजनमापे परवाना नुतनीकरण केले जाते. आता तर सर्वच व्यापारी हे इलेक्ट्रॉनिक व्हेन मशीन व बेबी वापरतात. त्यांचे नूतनिकरणासाठी त्यांना उघडणे व दुरुस्त करण्याची गरज नसते. पूर्वी सेलिंग, पेस्टींग, हमाली लागत होती आता ती लागत नाही. तरीसुद्धा सरकारी फी म्हणून ४०० रुपये ऍडजस्टमेंट, सेलिंग, व टेस्टिंग चार्ज म्हणून ८५० रुपये असे एकूण १२५० रुपये वसूल केले जातात.हे अवास्तव व नियमबाह्य असल्याचे जाणवते.तसेच या संदर्भात महाराष्ट्र राज्य पंचायत शाखा तळोदा येथे अनेक व्यापाऱ्यांनी लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.तरी आपण आपल्या स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा जेणेकरून सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी नंदुरबार जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे उपाध्यक्ष कीर्ती कुमार शहा,जिल्हा संघटक प्रा.आर.ओ.मगरे,तळोद्याचे अध्यक्ष डॉ संजयकुमार शर्मा. जिल्हा सदस्य ए.डी.सुर्यवंशी.,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार. सहयोग शोषल ग्रुपचे अध्यक्ष अँड. अल्पेश जैन. प्रवासी महासंघाचे अध्यक्ष राजेश चौधरी. सचिव रमेशकुमार भाट व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तहसीलदार गिरीष वाखारे यांनी सांगितले की संबंधीत अधिकारी यांना आपल्या समवेत लवकरच चर्चा करण्यासाठी बोलवू व यातून यशस्वी मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.



