शिंदखेडा स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडले , छत्तीस लाखावर रक्कम लंपास
शिंदखेडा तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत )
शिंदखेडा : येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी छत्तीस लाखावर रक्कम लांबविल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. याबाबत शहरात एकच खळबळ उडाली. सर्व पोलिस यंत्रणा याकामी तपासाला लागली आहे. श्वानपथक मागवण्यात आले आहे .
याशिवाय फिंगरप्रिंट एक्सपर्ट ही दाखल झालेले आहे. याबाबत अज्ञाता विरुद्ध येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
शिंदखेडा शहरात शिरपूर रोड लगत स्टेट बँक आहे.
बँकेला लागूनच बँकेचे एटीएम मशीन आहे.
या मशीन मध्ये शुक्रवार दिनांक 12 रोजी 39 लाख रुपये लोड करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ग्राहकांनी काही रक्कम काढली असतांना 36 लाख 86 हजार 500 रुपये मशीन मध्ये शिल्लक होते. अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीन प्लेझर मशिनच्या साह्याने फोडून ही रक्कम
लांबविली आहे.
एटीएम मशीनच्या आजूबाजूस बँकेचे तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. मात्र यातील एका कॅमेऱ्यावर चोरट्यांनी स्प्रे मारलेला आहे.
तर अन्य दोघे कॅमेरे ची
दिशा बदलून त्यांच्या वायरी तोडण्यात आलेल्या आहे. याशिवाय बँकेसाठी असलेल्या अलार्म च्याही वायरी चोरट्यांनी तोडलेल्या आहे. आज दुपारी बारा वाजता बँकेचे उपव्यवस्थापक अविनाश पगारे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी त्वरित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली.
शिंदखेडा पोलिसांनी त्वरित दखल घेत घटनास्थळी येऊन पाहणी केली लगेचच धुळे येथून श्वानपथक मागवण्यात आले.सदर श्वान बँकेच्या आवारातच फिरले.
रस्ता सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सद्यस्थितीत फिंगरप्रिंट एक्सपर्ट घ्या मदतीने
घटनेचा तपास सुरू आहे.
सदर घटना शुक्रवारी रात्री म्हणजे शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे एटीएम मशीन बंद असल्याबाबतचा मेसेज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आलेला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित अधिकाऱ्यांना आज रविवारी सकाळी पुन्हा मॅसेज आल्यामुळे श्री पगारे हे एटीएम मशीन दुरूस्ती साठी येथे आले आणि त्यांच्या लक्षात हि घटना आली.
चोरट्याने शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही चोरी केली असल्याचा अंदाज आहे. चोरी करून जाताना चोरट्यांनी एटीएम मशीन कक्षाचे शटर बंद करून गेले. दूसर्या दिवशी शनिवार, बँकेला सुट्टी असल्या कारणाने शटर बंद असल्या कारणाने एटीएम बंद असेल असे गृहीत धरून अनेक ग्राहक येथे येऊन परत गेले.
लाखो रुपये एटीएम मशीन मध्ये रोज लोड झालेले असताना या एटीएम सेंटरची सुरक्षा मात्र वाऱ्यावरच आहे. या ठिकाणी एकही सुरक्षारक्षक नाही.
त्याचा गैरफायदा अनेक टोळके घेत असतात.
याबाबत येथे सुरक्षारक्षक असावा अशी मागणी
अनेकदा झालेली आहे. मात्र बँकेच्या पॉलिसी प्रमाणे सुरक्षारक्षक नसतो असे बँकेच्या धिकार्यांकडून सांगण्यात आले.
सदर घटनेचा तपास पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भांबड पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे यांचेसह श्वान पथकातील किरण निकम, गोरख मंगळे
घटनास्थळी दाखल झाले.
एका सीसी टीव्हीमध्ये कैद झालेल्या दृश्या नुसार तीन ते चार चोरटे असल्याचे दिसत आहे.
त्यांनी अंगात जॅकेट घातलेले असून डोक्यावर कान टोपी घातलेली आहे. चेहराही कानटोपीने झाकलेला दिसत आहे. चोरट्यांचा लवकरच शोध घेतला जाईल असे पोलिस विभागातर्फे सांगण्यात आले.