शिंदखेडा येथे बसस्थानक शुकशुकाट कर्मचारी संघटनेचा बेमुदत संप सुरू सर्व कर्मचारी सहभागी शिंदखेडा भाजपाचा पाठिंबा
तालुका विशेष प्रतिनिधी
शिंदखेडा : येथील बसस्थानक परिसरात गेल्या सहा दिवसा पासुन सुरु असलेल्या संपात आज मात्र बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला असून शुकशुकाट दिसून आला.एकही बस न धावु देण्याचा तालुका एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी पवित्रा घेतला असून तीव्र आंदोलन केले व आता बेमुदत संपावर गेले आहोत.राज्य परिवहन महामंडळाची बिघडलेली आर्थिक घडी . कर्मचारी चे अनियमित वेतन , हयामुळे कर्मचारी च्या आत्महत्या महागाई भत्ता यासह अनेक मागण्या व राज्य सरकारने एसटी बस चे शासनास विलगीकरण करावे ही प्रमुख मागणी आहे.हयावेळी सर्व संघटना प्रमुख पदाधिकारी यांनी सत्तप भावना व्यक्त केल्या.हयावेळी माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल . जिल्हाध्यक्ष नारायण पाटील , डी.आर.पाटील ,पंकज कदम ,सभापती अरुण पाटील , उपसभापती नारायणसिंग गिरासे ,जिजाबराव सोनवणे , पं.स.सदस्य रणजित गिरासे , गटनेते अनिल वानखेडे,माजी उपनगरध्यक्ष व नगरसेवक प्रकाश देसले ,तालुका अध्यक्ष आर.जी.खैरणार ,चेतन परमार ,विनोद पाटील, सोमनाथ माळी , शहराध्यक्ष प्रविण माळी ,तालुका चिटणीस दिनेश सुर्यवंशी ,ओबीसी सेल चे दिपक चौधरी यांनी पाठिंबा दिला .विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कामगाराच्या मागण्या पोहचु व न्याय मिळवून देवु असे आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले.कामगार कृती समितीचे समाधान पाटील , दिनेश पाटील, नितीन पाटील, मनोज साळवे , अरुण पाटील, गणेश भदाणे, नितीन खैरनार .सुरेश सोनवणे ,विनोद धनगर, मकसुद सैय्यद ,मनोज बाविस्कर, संजय बोरसे ,भटु सोनवणे, नितीन खैरनार . कपिल पाटील, शुभांगी तिडके. निवृत्ती पांढरे, मिना ठाकरे , राधा साळुंखे , संगीता पाटील यांच्या सह पदाधिकारी व जवळपास दोनशे कर्मचारी उपस्थित होते.