24 एप्रिल रोजी सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन
देगाव (प्रतिनिधी) आज रोजी ठाणे येथे अखिल भारतीय कोळी समाज, महाराष्ट्र शाखा, नवी दिल्ली, यांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परेश भाई कोळी यांचा अध्यक्षतेखाली कार्यक्रम सपंन्न झाला. 24 एप्रिल रोजी सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ सिंग गोविंद यांची उपस्थित राहणार आहेत. त्याना समाज वरील अन्यायाची समस्या माडण्याचा ठराव सामंत झाला तसेच जिल्हा कार्यकारणी बदलण्यात आली.
नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी सूकलाल दौलत कोळी, धुळे जिल्हा अध्यक्षपदी गिरधर अप्पा दाजमल महले, नासिक जिल्हा अध्यक्षपदी संजय गोरख शिंदे, नाशिक महिला अध्यक्ष कल्पना श्याम पिठे, जळगाव जिल्हाअध्यक्ष पी डी बागुल, राज्य सचिवपदी अनिल ननावरे, खानदेश महिला प्रदेश अध्यक्षपदी एडवोकेट शोभा खैरनार यांची नियुक्ती झाली. कार्यक्रमास रावसाहेब सैंदाने, देविदास नवसारे, दिलीप बागुल, डॉ. राजेंद्र सावले, गोविंद कोळी उपस्थित होते.



