महाराष्ट्र

नियमाची पायमल्ली करून चालवत असलेल्या आधार केंद्र व सेतू केंद्रावर कडक कार्यवाही

धारणी (प्रतिनिधी) वैभव वाघमारे भा.प्र.से. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी जि.अमरावती यांचा अभिनव उपक्रम नियमाची पायमल्ली करून चालवत असलेल्या आधार केंद्र व सेतू केंद्रावर कडक कार्यवाही केली आहे.

धारणी तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांकडून नवीन आधार कार्ड काढणे, दुरुस्ती करणे, e-KYC करणे तसेच जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमिलिअर इत्यादी शासकीय सुविधेकरिता नियमबाह्यरित्या जास्तीचे दर आकारून पिळवणूक करत असल्याची तक्रार परिसरातील आदिवासी बांधवांनी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेली होती. त्यासाठी सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊनप्रकल्प अधिकारी यांनी अचानक शहरातील विविध आधार केंद्रावर व सेतु केंद्रावर आकस्मिक भेट देवून तपासणी केली. यामध्ये त्यांच्या केंद्रावर शासनाने ठरवून दिलेले दर पत्रक न लावणे, दरापेक्षा जास्त रक्कम आकारणे, जेथे केंद्र मंजूर केले आहे. त्याठिकाणी चालवत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा गंभीर बाबी आढळल्याने सदर आधार केंद्र व सेतू केंद्राला सील करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे