एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दोन वेळा फोन ; जाणून घ्या… नेमकं कोणत्या विषयावर झाली चर्चा
मुंबई : एकनाथ शिंदेंचा फोन काल थेट ‘शिवतिर्थ’वर गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंनी त्यांना फोन केला होता. तसेच दोन वेळा या नेत्यांमध्ये काल फोन कॉल झाला ज्यामध्ये राजकीय चर्चाही झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाईला आजपासून सर्वोेच्च न्यायलायात सुरुवात होणार असून संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज सुनावणी होणार असून रविवारपासूनच दोन्ही बाजूच्या पक्षांकडून यासंदर्भातील तयारी सुरु झाली आहे. मात्र या राजकीय घडामोडी आणि न्यायलयीन लढाईच्या तयारी दरम्यान बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा फोन काल थेट ‘शिवतिर्थ’वर गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंनी त्यांना फोन केला होता. तसेच दोन वेळा या नेत्यांमध्ये काल फोन कॉल झाला ज्यामध्ये राजकीय चर्चाही झाल्याची माहिती समोर आलीय.
एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना रविवारी फोन केला. राविवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंनी राज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिंदे आणि राज यांच्यामध्ये काही मिनिटं प्रकृतीसंदर्भातील चर्चा झाली. राज यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आलाय. शस्त्रक्रियेनंतर राज शनिवारी घरी परतल्याचं त्यांनीच ट्विटरवरुन जाहीर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली. तसेच राज यांची या दुखण्यापासून लवकर सुटका व्हावी अशा शुभेच्छाही शिंदेंनी दिल्याचं समजतं. या फोन कॉलदरम्यान शिंदे यांनी राज ठाकरेंना राजकीय घडामोडींसंदर्भातील माहिती देताना आपली बाजूही सांगितल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय.