विनायक साखर कारखाना परिसरात २५० एकरला आग
वैजापूर (भिमसिग कहाटे) वैजापूर तालुक्यातील विनायक साखर कारखाना परिसरात देवडोंगरी बाबाचा डोंगर परिसरात सुमारे 250 एकर परिसरात आग लागली होती. या नव्या मध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर चारा जळून खाक झाला. शेतातील उभी असलेली मका कांदा गहू ही पिके मोठ्या प्रमाणात होरपळला व देव डोंगरी बाबा डोंगरावरील शेकडो झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी जळून खाक झाली.
ही आग विझवण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील बोडके यांनी माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांच्याशी संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली असता त्यांनी ताबडतोब आग विझवण्यासाठी नगरपरिषदेची अग्निशामक गाडी पाठवली व विनायक नगर परिसरात होणारी मोठी हानी टाळण्यास मदत केली. विनायक साखर कारखाना आगीच्या विळख्यात सापडला होता. अग रुद्र रूप धारण करून कारखान्यात घुसली होती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने आग विझविण्यात यश आले विनायक सहकारी साखर कारखाना परिसरातील ग्रामस्थ व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दिनेश परदेशी यांचे व अग्निशामक दलाचे आभार मानले घटनास्थळी सुनील बोडके यांचे मोलाचे योगदान होते.