होळी निमित्त गरीब, जरूरतमंद, विधवा निराधार महिलांना साडी वाटप
धारणी (पंकज मालवीय) धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रा.प.दिया चे सामाजिक कार्यकर्ता कालू उर्फ शैलेश मालवीय व त्याची पत्नी माया मालवीय आपल्या कर्तृत्वाने ओळखले जातात. दरवर्षी गरिब, विधवा, निराधार, जरूरतमंद लोकांना फुल नाही तर फुलांची पकुळी या युक्तीला अनुसरून आपल्या द्वारे दरवर्षी शण उत्सवात मदत करून गरीबांच्या चेहऱ्यावर व मनात हास्य देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या याच उपक्रमला अनुसरून या वर्षी सुध्दा होळी उत्सव निमित्त दिया येथे गरिब, निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले.
होळी उत्सवाच्या निमित्त निराधारांना साडी वाटपाच्या या कार्यक्रमाला दिया चे सामाजिक कार्यकर्ता कालू उर्फ शैलेश मालवीय, पोलिस पाटील विजय मावस्कर, सरपंच निशा भिलावेकर, शोभा कासदेकर, आकाश जावरकर तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. साडी वाटपातुन निराधार महिलांना होळी सणात मदतीचा हात मिळाला. व त्यांनी आभार मानून मदत करणाऱ्यांना आशिर्वाद दिले.