खा. रक्षाताई खडसे यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट
नवी दिल्ली : खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन किसान रेलच्या यशस्वी संचालनासाठी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आभार मानले व रावेर लोकसभा क्षेत्रातील रावेर व सावदा रेल्वे स्टेशन येथून किसान रेल वाढविणे बाबत व भुसावळ व निंभोरा रेल्वे स्टेशन येथून नवीन किसान रेल सुरु करणे तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने नव्याने सुरु केलेल्या फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टीकल्चर क्लस्टर डेव्हलोपमेंट प्रोग्राम) अंतर्गत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा बाबत मागणी केली.
बागायतीच्या समग्र विकासासाठी मोदी सरकारच्या सप्तवर्षीपुर्ती निमित्त केंद्रीय कृषी मंत्रालयद्वारे विविध फळांसाठी देशातील १२ राज्यातील ५३ जिल्ह्यांमधील पथदर्शी कार्यक्रमाचा विचार करून फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टीकल्चर क्लस्टर डेव्हलोपमेंट प्रोग्राम) (सीडिपी) योजना सुरु केली आहे, सदर योजनेंतर्गत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात यावा याबाबत सुद्धा खासदार रक्षाताई खडसे यांनी सविस्तर चर्चा करून मागणी केली.
रावेर लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणवर उत्कृष्ट प्रतीच्या केळीचे उत्पादन होत असुन, खूप मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात येते असते. सदर भागातील केळीची उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी असुन, जर फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टीकल्चर क्लस्टर डेव्हलोपमेंट प्रोग्राम) अंतर्गत केळी पिकासाठी जळगांव जिल्ह्याचा समावेश झाल्यास त्याअनुषंगाने येथे होणाऱ्या औद्योगिक विकासाच्या दुर्ष्टीने व केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्वपूर्ण व फायद्याचे ठरेल.
तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टीकल्चर क्लस्टर डेव्हलोपमेंट प्रोग्राम) अंतर्गत केळी पिकासाठी जळगांव जिल्ह्याचा समावेश होणेबाबत आपल्यास्तरावरून संबंधित मंत्रालयाला शिफारस करण्यात यावी तसेच अधिक किसान रेल वाढविण्यात येऊन नवीन किसान रेल सुरु करण्यात याव्या याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे कळकळीची विनंती केली.