कासोदा येथील सेंट्रल बँक मॅनेजर राजु शर्मा यांचा कोरोना योध्दा म्हणुन युवा गुर्जर महासभेकडून सन्मान
धुळे जिल्हा विशेष प्रतिनिधी
धुळे – कोरोना महामारीत एरंडोल (जि.जळगांव) तालुक्यांतील कासोदा गावाचे सेंट्रल बॕकेचे मॕनेजर राजु श्यामजी शर्मा यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना बॕकेची कामे , सुविधा जातीने उपलब्ध करुन दिल्या याच दरम्यान ते स्वतः कोरोनाने बाधीत झाले होते त्यातून सावरत लोकांना बॕकेची कामे करुन देत राहिले त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांना कोरोना योध्दा म्हणुन सन्मानित करण्यांबाबतची शिफारस वरखेडे गावाचे पत्रकार तथा धुळे ग्रामीण वृत्तपत्राचे संपादक गजेंद्र नारायण पाटील यांनी युवा गुर्जर महासभेकडे केली होती त्यांची दखल घेवून महासभेचे प्रदेशाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी कासोदा सेंट्रल बॕकेचे मॕनेजर राजु श्यामजी शर्मा यांची कोरोना योध्दा म्हणुन निवड केली
व १६ नोव्हेबर रोजी कासोदा तालुका एरंडोल येथील सेंट्रल बॕकेत जावून धुळे तालुक्यांतील वरखेडे गावाचे पत्रकार तथा धुळे ग्रामीण वृत्तपत्राचे संपादक गजेंद्र नारायण पाटील , दुर्गादास पाटील , वाल्मिक ठाकरे , गोपाल भोई , व बँकेचे सगळे सहकारी व कर्मचारी आदीच्या उपस्थितीत मॕनेजर राजु श्यामजी शर्मा यांना कोरोना योध्दा प्रमाणपत्र गुलाब पुष्प देवून सन्मानित करण्यांत आले.