महाराष्ट्र
आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या निधीतून तालुक्यातील शाळांना संगणक संचाचे वाटप
तळोदा (दिपक गोसावी) नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीरजी तांबे यांच्या आमदार निधीतून तळोदा तालुक्यातील शाळांना संगणक संच देण्यात आले. त्यांचे वाटप माजी मंत्री पदमाकरजी वळवी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, नगरसेवक गौरव वाणी, न.पा. सभापती हितेंद्र क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष निमेश सुर्यवंशी, मुख्याध्यापक एस.जी.पाडवी, प्राचार्य निलेश सुर्यवंशी, ईश्वर पोटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप परदेशी, कृ. उ. बा. समिती सदस्य भरत चौधरी, सुधाकर पटेल, कैलास चौधरी, योगेश मोरे, गजानन काटे, सुशिल सुर्यवंशी, भुवनेश भामरे, खुशाल पोटे, कैलास पाटील यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.