महाराष्ट्र
आदिवासी टोकरे कोळी जमातीचे लढाऊ व्यक्तीमत्त्व हरपले
धुळे (गोपाल चव्हाण) आज आदिवासी टोकरे कोळी जमातीचे धुळे येथील कट्टर कार्यकर्ते जेष्ठ नेते विनायक कोळी यांचे निधन झाले आहे.
स्व. अण्णा यांचे समाजासाठी केलेले योगदान खूप मोठे होते समाजासाठी मोठमोठे वधूवर मेळावे, मोर्चे, आंदोलन, लढा याद्वारे त्यांनी समाजसंघटन होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. वेळोवेळी सक्रिय भुमिका त्यांनी समाजासाठी घेतली. लहान कार्यकर्ते, महीला यांना नेहमी ते योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन देत राहीले. वेगवेगळ्या गोष्टीबद्दल नेहमी ते चिंतन मार्गदर्शन करायचे खरोखरच स्व. अण्णासाहेबांच्या जाण्याने खूप मोठे कधीही भरून न येणारे नुकसान समाजाचे झाले आहे. आदिवासी टोकरे कोळींच्या लढ्यातील अनमोल रत्न आपण गमावले आहे.