मोदलपाडा येथे दिंडल मातेचा उत्सव साजरा
तळोदा (दिपक गोसावी) तळोदा तालुक्यातील होजनाही येथिल दिंडल मातेच्या मंदिरा पासून दर तीन वर्षांनी दिंडल मातेच्या कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
यावर्षी तळोदा तालुक्यातील मोडलपाडा येथे दिंडल मातेचा उत्सव व दिंडल नाचविण्याच्या कार्यक्रम माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमाताई वळवी, तथा मोदलपाडा ग्रामस्थ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. दिंडलाचा कार्यक्रम हा सलग दोन दिवस चालतो. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, येथील आदिवासी समाज बांधव भगिनी व अबालवृद्ध मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवतात. यावेळी मोदलपाडा येथे सर्व सामाजिक, राजकीय, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रम मोदलपाडा येथून शिर्वे, गणेश बुधावल, होजनाई, येथे जाऊन तेथे असलेल्या दिंडल मातेच्या मंदिरात जाऊन विसर्जन होईल.
हा दिंडल मातेच्या कार्यक्रम ९ गांव मिळुन दर तीन वर्षांनी आयोजित करण्यात येतो. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोवीडच्या प्रादुर्भावामुळे सदर दिंडल मातेच्या कार्यक्रम बंद होता ह्या वर्ष्यापासून दर तीन वर्षांनी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सदर कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नसतांना कार्यक्रम शांततेत पार पडला .कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सदर कार्यक्रम सुनियोजित पणे पार पाडणेकामी मोदलपाडा ग्रामस्थांनी व युवकांनी परिश्रम घेतले.