अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्या दोघांना अटक
धुळे (अब्दुल मलिक) गुटख्याची अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या दोघांना धुळे तालुका पोलिसांनी अटक केली असून ९ लाख ४ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबु सुफीयान करीम अहमद व मौलाना मुजाहीद अंजुम असे आरोपींचे नावे आहेत.
याबाबत अधिक असे की, धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली त्यावरून सापळा रचून गुटख्याची अवैध पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनाचा शोध घेतला. सदर वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये एकूण ८९ लहान प्लॅस्टीक गोण्या त्यात महाराष्ट्र राज्यात वाहतुक, साठा व विक्रीस प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला व व्ही१ तंबाखु असलेला एकूण ४,२४,२७० रुपयांचा विमल पानमसाला व विंगर वाहन क्र. एम. एच.४३ एक्स.९९२५ असे मिळून आले आहे. अशा प्रकारे विमल पानमसाला व तंबाखु आणि ट्रॅव्हल्स वाहन असा एकूण ९,०४,२७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचा विमाल पानमसाला हा मालेगाव येथे छुप्या पध्दतीने विक्री करण्यासाठी वाहतुक करून घेवून जात असल्याचे दिसून आले आहे. सदर विमल पानमसाला व विंगर वाहन व वाहनावरील चालक अबु सुफीयान करीम अहमद (वय २७ रा. प्लॉट नं. ४, गुलशन अश्रम नगर, रमजानपुरा, मालेगाव ता. मालेगाव जि.नाशिक) व त्यासोबत असलेला मालाचा मालक मौलाना मुजाहीद अंजुम (वय ४५ रा. अस्लमपुरा, मालेगांव ता. मालेगाव जि. नाशिक) अशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री प्रदीप मैराळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे पथक पोसई सागर काळे, पोहेका प्रविण पाटील, पोहेकॉ महेश्वर गोसावी, पोना अविनाश गहीवड, पोना संतोष देवरे, पोका धिरज सांगळे, पोका भुषण पाटील, पोकॉ कुणाल शिंगाणे, पोकॉ विशाल गुरव यांनी केली आहे.