तृप्ती धोडमिसेंवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी अॅड.गणेश सोनवणेंच्या नेतृत्वात ११ व १२ एप्रिल रोजी सत्याग्रह पदयात्रा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शासनस्तरावरून अनुसूचित जमातीचे यादीत असलेले महादेव, मल्हार, ढोर व टोकरे कोळी, हया जमातींना संविधानीक सेवा सवलतीपासून वंचीत ठेवले जाते. या प्रकरणी दोषी शासकीय अधिकारी १) तृप्ती घोडमिसे, प्रकल्प अधिकारी, तथा उप विभागीय अधिकारी २) भटु आनाजी आव्हाड शिक्षण विस्तार अधिकारी, ३) नवनाथ जानकर, सहाय्यक प्रकल्प अधिकार हे शासनाचे खावटी योजना राबवतांना पक्षपातीपणा करतात.
शिंदखेडा वसतिगृहात प्रवेश नाकारण्यासारख्या गैर कृत्य करून अस्पृश्यांसारखी वागणून देतात म्हणून त्यांचे विरूध्द भारतीय दंड संहिताचे कलम १६६, ॲअॅट्रासिटी ॲअॅक्ट अंतर्गत, कारवाई करण्यात यावी व जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम २००० चे कलम १३ प्रमाणे मा तृप्ती धोडमिसे, उप विभागीय अधिकारी, धुळे ता जि धुळे यांनी खोटे प्रमाणपत्रे दिले म्हणून त्यांचेवर कारवाई करण्यासाठी व अन्याय हाणून पाडण्यासाठी ॲअॅड. गणेश सोनवणे हे जिल्हाधिकारी कार्यालयावर व पोलीस अधिक्षक धुळे यांचे कार्यालयावर अनुसूचित जमातीचे बांधवांचे प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, न्याहाळोद ते जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे दि ११ व १२ एप्रिल २०२२ रोजी पायदळ पदयात्रा काढून जाणार आहेत.
आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक जमात बांधव स्वयंस्पुर्तीने जमातीला न्याय मिळावा म्हणून समाज बांधवांनी उपस्थितीत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक धुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आदर्श अनुसूचित जाती-जमाती बहुद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.गणेश सोनवणे, हेमंत विशाल सुर्यवंशी, नामदेव येळवे, महेश सावळे, समाधान मोरे, वैशालीताई सैंदाणे चव्हाण, गीतांजलीबाई कोळी, अॅड. विशाल सोनवणे, विजय हेमलाल सोनवणे, राजधर सेना सावळे, युवराज दौलत ईशी, राजेंद्र शिरसाठ, ऋषीकेश हिंम्मत शिरसाठ, भिकनराव लोटन, बिरारी सागर, बापु वाघ, लोटन बारकू कोळी, शरद भानुदास बागुल, सुनिल आंनंदा वाघ, लहू मन्साराम कोळी, तुळशिराम नानक कोळी, कृष्णा ब्रिजलाल कोळी, आनंदा सुकलाल कोळी, भारती तारू, निखील तारू, सोहम तारू आदी उपस्थित होते. पायदळ पदयात्रेला समाज बांधवांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अॅड.गणेश सोनवणे यांनी केले आहे.