वैजापूर तालुक्यातील करंजगाव गावकऱ्यांनी बघितले मृत्यूचे दार
वैजापूर (प्रतिनिधी) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुंबईकडून येणारा एचपी गॅस भरलेला टँकर गाडी नंबर एम एच 48 ए जी 87 84 हा वेगाने औरंगाबादच्या दिशेने जात असताना वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे चालकाचा ताबा सुटल्याने साडेसात वाजता पलटी झाला. पण यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. गावकऱ्यांनी त्याचा स्फोट होईल या भीतीने घटनास्थळी जाऊन मोठा गदारोळ घातला.
त्या ठिकाणी करंजगाव पोलीस पाटील व नागरिकांनी शासन कर्मचाऱ्यांना धारेवर धरले की, घटना साडेसात वाजता झाली असता तुम्ही साडे दहा ते साडे अकरा वाजता घटनास्थळी आला. शासनाचा हा बोगस कारभार कुठपर्यंत चालायचा आशा घटना या ठिकाणी वारंवार होत असतात. गावकरी आपला जीव मुठीत धरून येथे राहत आहेत व शासनाची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही असे करंजगाव नागरिकांनी सांगितले.
घटनास्थळी तहसील कर्मचारी विक्रम वरपे, तलाठी त्यानंतर महामार्ग पोलीस औरंगाबाद पीएसआय आलमगीर शेख, प्रकाश मोहिते, ईश्वरसिंग जारवाक, वैजापूर पोलीस पीएसआय गोरक्ष खरड, रमेश जाधवर, योगेश झालरे, अमोल मोरे व अग्निशामक दलाच्या तीन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. औरंगाबाद विभाग गाडी दहा वाजता घटनास्थळी आली होती. वैजापूर अग्निशामक साडेदहा वाजता व बजाज अग्निशामक गाडी ११.२५ मिनिटांनी घटनास्थळी आल्या होत्या. दरम्यान, यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही व करंजगाव नागरिकांवरील मोठी दुर्घटना टळली.