जळगाव जिल्हा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नंदूरबार जिल्हाध्यक्षपदी पत्रकार प्रा.हितेश पटेल यांची निवड

नंदुरबार (प्रतिनिधी) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नंदूरबार जिल्हाध्यक्षपदी दैनिक लोकमत या वृत्तपत्राचे पत्रकार प्रा. हितेश पटेल यांची निवड करण्यात आली आहे.

प्रा. हितेश पटेल गेल्या 12 वर्षांपासून पत्रकारिता, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात जिल्हा संघटक म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. त्या कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष व राज्य पदाधिकारी यांनी प्रा हितेश पटेल यांना बढती देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रा. हितेश पटेल संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू ,युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत ताद लापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटक साहेबराव बाबर, नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र वळवी, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31मार्च, 2022 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे