राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) देशाचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी समाजकंटकांनी हल्ला केल्याने आज रोजी भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भडगाव पोलीस स्टेशन व कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार भडगाव यांना जाहीर निषेधचे निवेदन देण्यात आले.
यावेळी भडगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष अरुण सोनवणे, शहराध्यक्ष शामकांत भोसले, महिला अध्यक्ष रेखाताई पाटील, युवती अध्यक्ष दक्षता पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगरसेवक सुभाष पाटील, इसाक मलिक, महिला जिल्हा उपाध्यक्ष योजना ताई पाटील, डॉक्टर विजय देशमुख, रवींद्र महाजन, मोतीलाल नरवाडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष. रफू दिन शेख, युवक कार्याध्यक्ष स्वदेश पाटील, रवींद्र महाजन, भाऊसाहेब परदेशी, कजगाव शहराध्यक्ष अशोक पाटील, युवक उपाध्यक्ष विकी पाटील, कुणाल पाटील, भगवान पाटील, डॉक्टर सुनील पाटील, सुरेंद्र मोरे, अनुप बोरसे, श्याम पाटील, अनिल टेक, योगेश पाटील आदी उपस्थित होते.