महाराष्ट्र
नवीन ६३ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मरसाठी जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर
धुळे (प्रतिनिधी) तालुक्यातील नाणे येथील शेतीपंपासाठी विद्यमान ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त लोढ झाल्याने त्याठिकाणी नवीन ६३ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मिळावा म्हणून शेतकऱ्यांची आग्रही मागणी होती. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना जिल्हा नियोजन निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी चर्चा करून या कामासाठी जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर करण्यात आला.

यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळणार असून पुढील हंगामात सुरळीत विद्युत पुरवठा होणार आहे. मंजूर झालेल्या नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामाचा आज शुभारंभ केला. विद्युत कंपनीचे उपअभियंता चव्हाण, संबंधित ठेकेदार, सरपंच व त्यांचे सहकारी, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




