जळगाव जिल्हा
95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रक कवी म्हणून डॉक्टर भालेराव यांची निवड
मुक्ताईनगर (सचिन झनके) येथील कवी साहित्य डॉक्टर भालेराव यांची उदगीर लातूर येथे दिनांक 23, 24 ,25 एप्रिल रोजी होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन सीमा वरती भागातील निमंत्रण च्या कवी संमेलनाचे निमंत्रण कवी म्हणून साहित्य मंडळाने निवड केली आहे.
त्यांचे आज पर्यंत पंधरा पुस्तके प्रकाशित आहे. त्यामध्ये चार कादंबरी, दोन कथासंग्रह, दोन कविता संग्रह दोन चरित्र एक समीक्षा संपादन तर धर्म ते धम्म कादंबरीचा हिंदी अनुवाद झाला आहे. तसेच किशोर व जीवन शिक्षण या शासनाच्या मासिकांमध्ये ही त्यांची साहित्यप्रकारशीत झाले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन मुक्ताईनगर तालुक्यामध्ये करण्यात येत आहे.


