महाराष्ट्र

शिंदखेडा येथे भिल महासंमेलन (11 एप्रिल) आयोजन संदर्भात पदाधिकारी यांची बैठक संपन्न

विविध नियोजन समिती गठीत महासंमेलन यशस्वी करण्याचे आवाहन

शिंदखेडा (यादवराव सावंत) भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य आयोजित भिल महासंमेलन यशस्वी करण्यासाठी आज शिंदखेडा येथे नियोजित जागेवर संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व संस्थापक सदस्यांची बैठक संपन्न झाली.

यावेळी संमेलन स्थळाची पाहणी करून स्थळ निश्चित करण्यात आले. तसेच संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध नियोजन समितीची निवड करण्यात आली. त्यात भोजन समिती, वाहन पार्किग समिती, मंडप नियंत्रण समिती, स्टेज आयोजन व देखरेख समिती, पाणीपुरवठा समिती आदी गठीत करून जबाबदारी सोपविण्यात आली. पहिले भिल महासंमेलन दि. 11 एप्रिल सोमवार रोजी शिंदखेडा नगरीत होत असुन ते यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र भर पदाधिकारी व कार्यकर्ते हिरहिरीने जिल्हा तालुका गावातील कानाकोपरा पिंजून काढत आहेत.त्यांच्या श्रेयामागे सर्वच सदस्य व कार्यकर्ते काम करीत असल्याचे हयावेळी कौतुक केले. सर्वच भिल समाजात महासंमेलन यशस्वी करण्यासाठी अंगात वारे संचारले असुन भिल समाजातील व्यथा महाराष्ट्र शासनाच्या लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे.म्हणुन जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी ऐतिहासिक संमेलनाचे साक्षीदार व्हावे व मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.तसेच जिल्हा सचिव अशोक सोनवणे, शहादा तालुकाध्यक्ष राजु सोनवणे, तामथरे गटप्रमुख भाऊसाहेब मालचे यांनी आपले विचार व्यक्त करताना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.हयावेळी संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, जेष्ठ सदस्य बापुजी फुले, गणेश सोनवणे, बळीराम निकुम, नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, श्रीराम मोरे, भाऊसाहेब मालचे, शहादा तालुकाध्यक्ष राजु सोनवणे ,खजिनदार राजेश मालचे, बापू ठाकरे, शामा मालचे, संजय मालचे, सोशल मीडिया चे अशोक मालचे, मोहन ठाकरे, पावबा ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य शेवाडे पांडु मोरे, अशोक ठाकरे, रामभाऊ मालचे, महेंद्र मालचे, धनराज पहेलवान, किरण चित्ते, कालु मोरे, शहराध्यक्ष नरेंद्र मालचे यासह पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचलन नगरसेवक चंद्रकांत सोनवणे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे