महाराष्ट्र
हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद लष्कर अधिकाऱ्यांना सेना भवन येथे वाहण्यात आली श्रद्धांजली
सोयगाव (विवेक महाजन) तामिळनाडूतील निलगिरी जिल्यानजीक कुन्नूरच्या दाट जंगलात भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले यात भारताचे पाहिले वहिले संरक्षण दल प्रमुख बिपीन रावल त्यांच्या पत्नीसह १२ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यु झाला. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात मेणबत्त्या प्रज्वलित करून दुर्घटनेतील शहीद लष्कर अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकरराव काळे, शहर प्रमुख संतोष बोडखे, अक्षय काळे, रमेश गव्हांडे, राजू दुतोंडे, लतीफ शाह, अशोक खेडकर, मंगेश सोहणी, संदीप चौधरी, शामराव बावस्कर, दिपक पगारे, भगवान जोहरे, सोपान देवरे, सलीम पठाण, राजमल पवार, दत्तू इंगळे, अरुण वाघ, भारत तायडे, राजेश सोनवणे, सागर गवळी, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.