साक्री शहरातील मतदार या वेळीही आम्हाला साथ देतील हा विश्वास : नानासाहेब नागरे
साक्री (प्रतिनिधी) साक्री शहरातील नागरिक बंधू-भगिनींनी मला आज पर्यंत नेहमीच साथ दिली आहे. या सहकार्य व आशीर्वादाच्या जोरावरच मी साक्री शहराचा विकास करू शकलो आहे. आणि हाच विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी साक्रीकर मतदार बंधू-भगिनींनी या निवडणुकीतही आम्हाला साथ देतील, असा विश्वास साखळीचे गटनेते नानासाहेब नागरे यांनी व्यक्त केला आहे.
दृकश्राव्य समाज माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करतांना नानासाहेब नागरे यांनी नमूद केले आहे की, खरंतर आज तरुणाईचे युग आहे म्हणूनच हा विचार डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त तरुण पिढीला प्रतिनिधीत्व करण्याची संधी यावेळी दिली आहे. या युवापिढी सोबत जाणत्या कार्यकर्त्यांना ही संधी देण्यात आली आहे. या सर्वांना साक्रीकर मतदार बंधू-भगिनींनी प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आव्हान गटनेते ज्ञानेश्वर गोविंद तथा नानासाहेब नागरे यांनी केले आहे.
सदर निवडणुकीत साक्री शहरातील १७ प्रभाग असून शिवसेनेतर्फे १३ व राष्ट्रवादी पक्षातर्फे ४ उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी देण्यात आली आहे.