अघई येथे राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत सात दिवसांचे निवासी शिबीर संपन्न
शहापूर (देविदास भोईर) औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई – ११ या संस्थेचे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सात दिवसांचे निवासी शिबीर विश्वात्मक जंगली महाराज आत्मा मलिक आश्रम अघई,ता.शहापूर येथे नुकतेच संपन्न झाले.या शिबिरात ग्रुप ग्रामपंचायत मोहिली व खोस्ते अंतर्गत येणाऱ्या आदिवासी पाड्यांवर ग्रामस्वच्छता करून घरातील विद्युत साहित्य आणि उपकरणाची दुरुस्ती करण्यात येऊन ग्रामस्थांना आयटीआय संबंधीत माहिती देण्यात आली.
दिनांक २१ मार्च ते २७ मार्च या कालावधीत संपन्न झालेल्या या शिबिरात प्रशिक्षणार्थींनी रंगकाम,सुतारकाम,वेल्डिंग,प्लबिंग,इलेक्ट्रिक वर्क सिव्हिल वर्क इत्यादी प्रशिक्षण घेऊन ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होऊन जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींवर चित्रे काढणे परिसरातील झांडांना रंग देणे हि कामे मोठ्या उत्साहात केली. दिनांक -२६ मार्च रोजी डि.एस.दळवी संचालक आणि नितीन निकम उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी शिबीराला भेट देऊन प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई -११ चे प्राचार्य विनोद खेवलकर यांनी शिबीराच्या कामांचा आढावा सादर केला तसेच सोबत एन.एन.एस कार्यक्रम अधिकारी आणि गट निदेशक व निदेशक उपस्थित होते. सदर शिबीराला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि प्रशिक्षणार्थी युवकांनी प्रतिसाद दिला.