धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचा उल्लेखनीय कार्याबाबत सत्कार
धुळे (प्रतिनिधी) धुळे तालुका पोलीस स्टेशनचे कार्यमग्न असणारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पदभार घेतल्या दिवसापासून तालुक्यातील गावासह परीसरात कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्याबरोबर गुन्हेगारी कारवाई जातीने आळा घालण्याचे काम करत आहेत. त्यातच वरिष्ठाच्या आदेशानुसार मालेगावाहून सुरतकडे घेवून जाणाऱ्या बेहिशोबी रक्कम पकडण्यांचे कार्य केले. त्याचप्रमाणे अवैध धंद्यावर वचक निर्माण करण्याचे कार्य करत अवैध धंद्यांना आळा घालण्यांचे काम करत आहेत.
हेमंत पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारल्या दिवसापासून दमदार कार्य सुरु ठेवले. त्यांच्या या कार्याची दखल घेवून जेष्ठ पत्रकार तथा स्पीड न्युजचे निवासी संपादक प्रदिप गोसावी, वरखेडे गावाचे पत्रकार तथा धुळे ग्रामीण वृत्तपत्राचे संपादक गजेंद्र नारायण पाटील यांनी हेमंत पाटील यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार आणि शुभेच्छा देवून त्याच्याकडून असेच उल्लेखनीय कार्य घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या.