संरक्षण भिंत नसलेल्या रसत्यालगत कोरड्या विहीरीत पडलेली गाय ; स्थानिकांच्या मदतीने गाईला काढले बाहेर
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) येथील सुंदरनगर समोरील संरक्षण भिंत नसलेल्या रसत्यालगत कोरड्या विहीरीत पडलेली गाय स्थानिकांचा मदतीने बाहेर काढ़ण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ येथील गोलाणी परिसरातील रहिवासी आसीफ खान अजीज खान उर्फ जानू हे उखड्यातील दुग्ध विक्रीचा व्यवसाय करतात व त्यांचा कडे सुमारे ८ ते१० म्हशी व गाय आहे. रोज प्रमाणे काल दि.९ रोजी त्यांनी आपली गुरंढोर चरण्यासाठी सोडलेअसता त्यापैकी एक गाय परतली नाही. त्यांनी संपूर्ण परिसरातील शोध काढला मात्र ती गाय कुठेच़ आढळून आली नाही. आज सकाळी परत आपली गायीचे शोधसाठी आसीफ खान हे निघाले.
सुंदरनगर समोर किरकोळ चिकन विक्री साठी दुकान करणारे व्यक्तिला विहीरीत पडलेली गाय निर्दर्शनास आली व ते आसीफखान यांचे ओळखीचे असुन त्यांनी आसीफखान यांना फोन करुन विचारले “एक गाय येथील कोरड्या विहीरीत पडलेली आहे ती तुमची आहे का?”
आसीफखान यांनी आल्यावर पाहिले व ही गायी आपलीच़ असल्याचे खात्री केली.एक गाय कोरड्या विहीरीत पडली आहे ही बातमी परिसरात वारा सारखी पसरली व नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सुंदरनगर येथील आशीष तिवारी यांनी क्रेन व गौ संरक्षण संस्थान चे गौसेवक राजू साळी यांना फोन करुन बोलाविले तसेच स्थानिकांची मदतीने क्रेनने आसीफ खान आणी राजू साळी यांनी विहीरीत उतरुन गायीला सुखरुप बाहेर काढले.
रस्त्यालगत अश्या कोरड्या विहीरीला संरक्षण भिंत बांधणे गरजीचे असुन उन्हाळात पाणी टंचाई टाळण्यासाठी नगरपालिकाने असे कोरडे झालेली विहिरींची साफ-सफाई केल्यास ह्या विहीरींना पाणी लागून पाणीटंचाई पासुन भुसावळकरांना सुटका मिळेल. अशी भावना स्थानिकांनी स्पीड न्यूज महाराष्ट्रशी बोलतांना व्यक्त केली.



