महाराष्ट्रराजकीय
जि.प. सदस्य गणेशदादा राजपूत यांच्या कार्याने प्रेरित होऊन गुळभेली येथील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !
मोताळा (संभाजी गवळी) आज गजानन महाराज संतनगरी शेगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड, जि.प. सदस्य गणेशसिंग राजपूत यांच्या कार्याला प्रेरित होऊन गुळभेली येथील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी रामेश्वर चव्हाण, दिलीप राठोड, दिलीप पवार, वंदन चव्हाण, तोताराम चव्हाण, शाम चव्हाण, अमोल राठोड, मोरसिंग चव्हाण, प्रेमसिंग राठोड, बाजीराव पवार, प्रेमसिंग चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये विजय फूलसिंग चव्हाण, शिवसेना शाखा प्रमुख आनंदा गोविंदा राठोड, किशोर बाबुराव चव्हाण, जानकीराम चव्हाण, आतिश मधुकर राठोड यांचा कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.