ब्रेकिंग
Trending
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आज पुन्हा समोरा समोर : काय होते राज्याचे लक्ष
विजय कुणाचा होईल : राज्यात चर्चच्या विषय
मुबंई : ( विशेष प्रतिनिधी ) महाराष्ट्रच तसेच देशासाठीही महत्त्वाच्या असणाऱ्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये होत असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करण्यात आली असून.
यामध्ये सरन्यायाधीश उदय लळीत यांचा समावेश नाही. सत्ता संघर्षावरची महत्त्वाची सुनावणी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, एम आर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी, नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर पार पडेल. निवडणूक आयोग पक्ष चिन्ह आणि शिवसेनेच्या नावासाठी निर्णय घेऊ शकेल का हे या सुनावणीमध्ये ठरण्याची शक्यता असून यात नेमका विजय कुणाचा होईल याकडे सम्पूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे .