आ. कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने लाभार्थींना राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य
धुळे तालुक्यातील ८७ प्रकरणे मंजुर
धुळे : धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेंतर्गत राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या एकूण ८७ लाभार्थी विधवा महिला बघिनींची प्रकरणे मंजुर करण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील विधवा बघिनींना दिलासा मिळाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पतीचा दूर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटूंब, पत्नी, आणि मुले निराधार होत असते. त्यामुळे शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. त्या अनुषंगाने धुळे तालुक्यातील राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत दाखल प्रकरणे मंजुर करण्यासाठी आ. कुणाल पाटील यांनी धुळे तहसिलदार यांना विशेष बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेची प्रकरणे प्रलंबित होते. त्याअनुषंगाने तातडीने बैठकिच्या सूचना देवून पात्र प्रकरणे मंजुरीच्याही सूचना आ. पाटील यांनी दिल्या होत्या. या बैठकित धुळे तालुक्यातील एकूण ८७ पात्र लाभार्थी विधवा महिला बघिनींची प्रकरणे मंजुर करण्यात आली आहेत. राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतून प्रति लाभार्थ्यास एकूण वीस हजार रुपयाचे अर्थसहाय्य केले जाते त्यामुळे लाभार्थी विधवा महिला बघिनींना खर्या अर्थाने आधार व दिलासा मिळाला आहे.



