तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा अनुष्का रमेश अहिरे द्वितीय
चोपडा (विश्वास वाडे) जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ जळगाव विद्या समिती स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कुल चोपडा येथे अतिशय उत्साहात संपन्न झाल्यात. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ताईसाहेब जयश्रीताई पाटील चव्हाण व प्रमुख पाहुणे दिपक विश्राम पवार मुख्याध्यापक मुन्सिपल हायस्कूल चोपडा हे लाभले.
या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी च्या गटात लीना सुरेश सोनवणे कस्तुरबा विद्यालय चोपडा प्रथम, मुग्दा विजय याज्ञिक प्रताप विद्या मंदिर चोपडा द्वितीय, सुशांत संजय पाटील पंकज विद्यालय चोपडा व वैभव मच्छिंद्र सोनवणे पंकज विद्यालय चोपडा विभागून तृतीय तसेच इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात किर्तिका विश्वनाथ चौधरी पंकज विद्यालय चोपडा प्रथम, अनुष्का रमेश अहिरे महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय चोपडा द्वितीय, उन्नती भरत पाटील कस्तुरबा माध्यमिक विद्यालय चोपडा तृतीय तसेच इयत्ता अकरावी व बारावीच्या गटात लक्ष्मी राजू कुंभार नूतन ज्ञान मंदिर अडावद प्रथम, हर्षदिव्या सुनील सोनवणे सी बी निकुम विद्यालय घोडगाव द्वितीय व गायत्री जगदीश धनगर नूतन ज्ञान मंदिर अडावद तथा तमन्ना आयोनुद्दीन खाटीक सी.बी.निकुम विद्यालय घोडगाव तृतीय बक्षीस विभागून. सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे ,त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची व मुख्याध्यापकांचे समस्त मुख्याध्यापक संघ चोपडा तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन* तसेच स्पर्धा यशस्वितेसाठी चोपडा तालूका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रविण पाटील, मंगेश चौधरी, बळवंत सोनवणे, संजय जोशी, विलास पाटील यांनी परिश्रम घेतले.