महाराष्ट्र
शहादा येथे कार्यालयाचे उदघाटन माजी कँबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या हस्ते होणार
मालपुर (गोपाल कोळी) आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य, नंदुरबार जिल्हयाच्या वतीने दि. २७ फेब्रुवारी २०२२ मिरा नगरप्रकाशा रोड, मनिष पेट्रोल पंप समोर शहादा येथे सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० च्या दरम्यान माजी कँबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
डॉ. भांडे हे दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी नवजीवन एक्स्प्रेसने अकोले येथून दोंडाईचा येथे सकाळी १०.०० वा पोहचत आहेत. दोंडाईचा येथून बाय कारने शहादा येथे कार्यक्रम स्थळी पोहचून सर्व प्रथम त्यांचे स्वागत होऊन कल्पतरु बंगलोच्या पहिल्या माळ्यावरील कार्यालयाचे डॉ. भांडे यांच्या हस्ते उद्घाटन, त्या नंतर फलक उद्घाटन व स्टेजवर आगमन व इतर मान्यवर यांचा सत्कार तत्पूर्वी दीप प्रज्वलित करून महर्षिच्या प्रतिमेस अभिवादन होईल.