आदिवासी टोकरे, ढोर कोळी यांच्या वतीने बोगस बोलणा-या व खोटे निवेदन देणा-या संघटना व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
शिरपुर (गोपाल कोळी) प्रांतांधिकारी कार्यालय व शिरपुर पोलीस स्टेशन येथे आदिवासी टोकरे कोळी वाल्या सेना गृप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने टोकरे कोळींविरोधात प्रशासनाची दिशाभूल करून खोटे निवेदन देऊन आदिवासींमध्ये तनावपूर्ण परीस्थिती निर्माण करणा-या आदिवासी विकास परिषद बिरसा फाइटर, बीरसा ब्रिगेड, या संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर वर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र आदीवासी जमाती 47पैकी अ.नु.28,क्र.असणा-या आदीवासी टोकरे ढोर कोळींबाबत बोगस हा शब्दप्रयोग करून अपमान व बदनामी करणा-या वरील बेजबाबदार संघटना व त्यांचे पदाधिकारी तसेच शिवसेना तालुकाप्रमुख आदिवासी विकास विभाग, प्रकल्प स्तरीय सदस्य इंजिनीयर अत्तर सिंग पावरा, सुंदर पावरा, विजय पावरा, राहुल पावरा सुनील मालचे, रोहिदास पावरा, दिलीप पावरा ,आल्या पावरा, किशोर पावरा, यांनी आधी लोकांनी कोणताही अभ्यास न करता महाराष्ट्र अनुसूचित जमातीत महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जमातीतील यादीतील अनुक्रमांक 28, 29, 30 या नंबर वर असलेल्या टोकरे ढोर कोळी जमातीबद्दल पदाधिकारी यांनी शिरपुर प्रांत अधिकारी शिरपूर यांच्याकडे आदिवासी टोकरे, ढोर, यांच्या बद्दल बोगस म्हणुन खोटी निवेदन 25/ 5 /2022 दिले. यामुळे समस्त धुळे नंदूरबार जिल्हातील आदीवासी टोकरे ढोर यांच्या भावना दुखावल्या गेल्या यासाठी आज आदीवासी वाल्या सेना गृप च्या वतीने संतप्त भावनेने खोटी निवेदन देणा-यासंघटना व पदाधिकारी यांच्यावर प्रशासनाची फसवणूक व जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हे दाखल करून खोटे निवेदन मागे घेण्याची व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली गेली.
यावेळी वाल्या सेना च्या गीतांजली कोळी, विमल सोनवणे, योगेश कोळी, गोपाल कोळी, मुकेश कोळी, वाल्मीक नगर येथील दिनेश कोळी, ईश्वर कोळी, गोलू कोळी, संदीप सोनवणे, नरेंद्र सोनवणे तसेच वाल्मीकलव्य संघटनेचे पवन सोनवणे, वाल्मीक कोळी, राहुल सोनवणे, किरण कोळी, नागेश कोळी, रोहित सोनवणे यांच्या सहीत आकाश कोळी, भटू कोळी, दिपक बागुल, बिट्या भोई, मेहूल लोणारी आदी या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी निषेध व्यक्त करून संतप्त निवेदन शिरपुर प्रांत आँफिस व शिरपुर पोलीस स्टेशन येथे दिले. यावर प्रशासकीय अधिकारी यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.



