सी गो पाटील महाविद्यालयात शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम
साक्री (सतिश पेंढारकर) विद्या विकास मंडळाचे सि गो पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री जिल्हा धुळे येथे विविध कार्यक्रमातून शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा केला गेला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत लेझीम ताल, प्रतिमापूजन व ध्वजारोहणास सोबत पारंपारिक वेशभूषा करत शिवजयंती उत्सहात साजरी केली.
याप्रसंगी ” छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचा युवक” या विषयावर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे होते. प्रसंगी उपप्राचार्य डॉ अनंत पाटील, पर्यवेक्षक प्रा डी पी पाटील, डॉ लहू पवार, डॉ एन डी भामरे, प्रा श्रीमती खैरनार, प्रा श्रीमती वाकोडे, प्रा श्रीमती जाधव उपस्थित होते.
‘राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय एक अनुबंध’ या विषयावरनिबंध स्पर्धेचे आयोजन देखील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. प्रसंगी कार्यक्रमात डॉ प्रीतम तोरवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा विश्वास भामरे, डॉ सुदाम चव्हाण,डॉ ज्योती वाकोडे यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली. इयत्ता सहावीतील विद्यार्थी यश देवरे याने उत्स्फूर्तपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र इंग्रजीतून मांडले.वक्तृत्व स्पर्धेत कु ऋतुजा पुंडलिक चव्हाण हिने प्रथम व जितेंद्र महेश खैरनार याने द्वितीय क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेत कु ऋतुजा पुंडलिक चव्हाण प्रथम तर रोहित विजय वाघ द्वितीय आला. कार्यक्रमाचे संचलन व आभार कु ऋचिका चाळसे हिने केले.
शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात बद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश पाटील, अध्यक्षा मंगलाताई पाटील, उपाध्यक्ष चंद्रजित पाटील यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.