शिंदखेडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने एक तास राष्ट्रवादीसाठी ही संकल्पना राबविण्यासाठी आवाहन -संदीप बेडसे
शिंदखेडा (यादवराव सावंत) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी “एक तास राष्ट्रवादीसाठी” हा उपक्रम राबविण्यासाठी आपापल्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करायची आहे.
एप्रिल महिन्याचा पहिला शनिवार म्हणजे दि.२ एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी शिंदखेडा मतदार संघातील प्रत्येक गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्याने “एक तास राष्ट्रवादीसाठी ” या संकल्पनेतून गावाच्या चौकात किंवा जिथे बैठक व्यवस्था असेल अशा ठिकाणी गावकऱ्यांची बैठक घेऊन शरद पवार यांचे विचार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा हेतु आहे. त्यासोबतच आपापल्या गावातील काही समस्या असतील त्या जाणुन घेऊन एका कागदावर लिहून राष्ट्रवादी संपर्क कार्यालय शिंदखेडा येथे जमा करायचे आहे.
दि.२ एप्रिल रोजीच्या बैठकिचे फोटो 7711851010 या व्हाट्सअप नंबर वर पाठवायचे आहेत.सदर अहवाल प्रदेश कार्यालय मुंबई येथे सादर करण्यात येणार आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी असे आवाहन संदिप बेडसे शिंदखेडा मतदारसंघाचे नेते व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्हा यांनी केले आहे.