महाराष्ट्र

जळीतग्रस्त कुटुंबाला मदत साहित्य वाटप

शित्तूर – वारुण : येथील शित्तूर-वारुणपैकी कदमवाडी येथे तेराखणी तिजयच्या घराला शाॕर्टसर्कीटमुळे आग लागुन घरगुती साहीत्य, मोटर सायकल, भांडी,कपडे, शेळ्या – मेंढया चा कळप आणि जीवनावश्यक वस्तू जळुन खाक झाले आहे.

घराचे अंदाजे तीस लाखाचे नुकसान झाले आहे. त्या कुटुंबाना मदतीचा हात म्हणुन शिराळा तालुक्यातील डफळेवाडी येथील ओम शिव गगनगीरी आश्रमाचे मठाधिपती महंत शंकरानंदगीरी डफळे महाराज यांनी पीडित सात कुटुंबाना गहु, तांदुळ, चटणी, मिठ, तेल, रवा, मैदा, डाळी तसेच ब्लॕकेट, साडया अशा संसारउपयोगी साहीत्याच्या किटचे वाटप केले. दैनंदिन गरजेच्या वस्तू वाटप करून मदत करणारी ही पहिलीच संस्था असून, सामाजिक, राजकीय, आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांनी पुढे येऊन पीडित कुटुंबान्ना सावरण्यासाठी यथाशक्ती मदत करणे गरजेचे आहे, तरच नुकसानग्रस्त कुटुंबाना सावरण्यास मदत होईल. यावेळी किनरेवाडी माजी सरपंच सदाशिव नावडे, वाकाईवाडी उपसरपंच सुभाष डफळे, किनरेवाडी पोलिस पाटील आकाराम किनरे, प्राध्यापक सदाशिव पाटील, दिलीप पाटील, राऊतवाडी मुख्याध्यापक सुरेश महींदकर, तानाजी डफळे, सुरेश भाईगडे, कृष्णा पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे