नेहरू युवा केंद्र आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन तर्फे कोरोना जनजागृती अभियान
साबण आणि मास्क वाटून नियमित वापरण्याची शपथ
धुळे : जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संसर्गजन्य विषाणू असल्याने पुन्हा सक्रिय होऊ शकतो या परिणामाचे पूर्वनियोजन करण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “कोरोना जनजागृती मोहीम” अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी अशोककुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अभियानाचा प्रथम टप्पा चाळीसगाव रोड परिसरातील, पश्चिम हुडको भागात पार पडला, यात साबण वाटप करून कशाप्रकारे ३० सेकंड हात धुवायला हवे याची पध्दत शिकविण्यात आली, तसेच मास्क वाटप करून नियमितपणे मास्कचा वापर करण्याची शपथ देण्यात आली. यावेळी येत्या काळात कोरोना प्रादुर्भावा पासून संरक्षण म्हणून हात धुणे, मास्कचा नियमित वापर करणे, आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे हेच आपले कवच आहे असे मार्गदर्शन के.वाय.के.एम चे सचिव कल्पेश बोरसे यांच्या कडून करण्यात आले.
यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, कल्याणी मोरे, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, साक्षी जाधव, राखी बडगुजर, प्रियंका विसपुते, भाग्यश्री भावसार, गौतमी कुलकर्णी, गणेश शेजुळ, ललिता पारीख उपस्थित होते.