धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक संपन्न प्रभाग क्रमांक ५ च्या इच्छूकांशी चर्चा
असंख्य तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश
धुळे – धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5 च्या पोटनिवडणूकीच्या संदर्भामध्ये पक्षातील विविध इच्छूक उमेदरांशी चर्चा करण्यात आली. त्यात विविध इच्छूक उमेदवारांनी आपली मते मांडली.
तसेच बारा डिसेंबर रोजी येणा·या मा.ना.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे शहरामध्ये विविध कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
दर तीन वर्षांनी होणा·या पक्षाच्या नवीन सभासद नोंदणीसंदर्भात नियोजन व चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जास्तीत जास्त क्रियाशील युवक, युवती, महिला, जेष्ठ, आदींनी नोंदणी करावी असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांनी केले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भाजप, एमआयएम, इतर पक्ष संघटनेतील अनेक पदाधिकारी, तरुणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळेस पक्षामध्ये प्रवेश करणा·या पदाधिकारी, तरुणांचा प्रवेश देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेस विद्यार्थी काँग्रेसच्या काही नियुक्त्या करण्यात आल्या. अतिशय उत्साही वातावरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली.
सदर बैठक ही पक्षाचे जिल्हा निरीक्षक मा.श्री.अर्जूनजी टिळे साहेब व प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.अनिल आण्णा गोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असून यावेळी बैठकीला धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, मनपा विरोधी पक्ष नेता कमलेश देवरे, ओबीसी उपाध्यक्ष कैलास चौधरी, संजयजी बगदे, राजेंद्र चितोडकर, महेंद्र शिरसाठ, सरोजताई कदम, राजेंद्र चौधरी, रजनिश निंबाळकर, सलीम लंबू, रईस काझी, ज्ञानेश्वर माळी, हिमानी वाघ, संजय माळी, बरकत भाई, जगन ताकटे, गिरीष भामरे, उमेश महाले, जमीर शेख, वामन मोहिते, अविनाश लोकरे, आबिद मन्यार, हाजी हासिफ बेग, हाशिम कुरेशी, शकीला बक्ष, गायत्री पाटील, दत्तू पाटील, यशवंत डोमाळे, राज कोळी, मीनू भाई, सुभाष पाटील, इमरान भाई, अकबर सर, सुरेखा नांद्रे, संदीप सरग, निलेश चौधरी, उषाताई पाटील, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.