मुर्डेश्वरच्या काशी येथील श्री श्वासानंद आश्रमास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची सदिच्छा भेट
सिल्लोड ( विवेक महाजन प्रतिनिधी ) दि.1, उत्तर काशी ( वाराणसी ) येथील श्री. श्वासानंद आश्रमास महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सदिच्छा भेट दिली. सिल्लोड तालुक्यातील श्री. मुर्डेश्वर संस्थानचे पिठाधिश प.पु. ओंकारगिरी महाराज या आश्रमाचे पिठाधिश आहेत. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत औरंगाबाद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे उपस्थित होते. यावेळी आश्रमाच्या वतीने येथील व्यवस्थापक माणिकराव मुरकुंदे व पुजारी संतोष महाराज शुक्ला यांच्याहस्ते राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच अर्जुन पा. गाढे यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. याप्रसंगी आश्रमाचे सदस्य भराडी येथील सतीश जैस्वाल देखील उपस्थित होते.
सद्या येथील आश्रमाचे अद्यावतीकरण व दुरुस्तीचे काम सुरू आहे. काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना येथे राहण्यासाठी तसेच विधिवत पूजा करण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. येथील आश्रमातील स्वच्छता व सोयी सुविधेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कौतुक केले. काशी येथील आश्रमास भाविक भक्तांच्या सोयीसाठी मित्र मंडळाच्या वतीने आवश्यक ती मदत करू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार याप्रसंगी म्हणाले.
काशी ( वाराणसी ) येथील जंगमवाडी येथे श्री. श्वासानंद आश्रम असून येथे वर्षाकाठी सिल्लोड – सोयगावसह राज्यातील जवळपास 5 हजार पेक्षा जास्त भाविकभक्त येवून जातात. श्री. मुर्डेश्वर संस्थान चे पिठाधिश प.पु काशीगिरी महाराज या आश्रमाचे पिठाधिश होते. त्यांचे देहावसान झाल्यानंतर परंपरेनुसार आता प.पु. ओंकारगिरी महाराज या आश्रमाचे पिठाधिश असल्याची माहिती येथील व्यवस्थापक माणिकराव मुरकुंदे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा सिल्लोड – सोयगाव मतदार संघाचे आमदार म्हणून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काशी येथे येवून आश्रमास सदिच्छा भेट दिल्या बद्दल येथील व्यवस्थापक माणिकराव मुरकुंदे ,पुजारी संतोष शुक्ला तसेच सदस्य सतिष जैस्वाल यांनी आभार व्यक्त केले.