डॉ. सुशीलाबेन शहा यांच्या ८१व्या उपक्रमशील कलाशिक्षक राज्य व प्रेरणा राज्य पुरस्कार
चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी
येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र या ग्रामीण भागात उच्च शिक्षण देणाऱ्या अनुदानित कला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुशीलाबेन शहा यांच्या ८१व्या उपक्रमशील कलाशिक्षक राज्य व प्रेरणा राज्य पुरस्कार दिनांक 5 डिसेंबर 2021 रविवार रोजी माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या शुभ हस्ते समारंभपूर्वक दिले जाणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव सौ उर्मिलाबेन गुजराथी आहेत. चित्रकला व शिल्प महाराष्ट्र राज्य मुंबई येथील निरीक्षक प्रा.संदीप डोंगरे, निवड समिती प्रमुख श्री.मोहन भोजापुरे (अकोला),श्री.मल्लिकार्जुन सिंदगी(पुणे), सौ.हेमा धोत्रे(पुणे), से.नि.निरीक्षक प्रा.भास्कर तिखे (मुंबई),खान्देशरत्न श्री.एल.झेड.कोल्हे(जळगाव), श्री.एस.डी भिरुड (जळगाव),श्री.आर.टी पवार(लासुर) हे दिग्गज कलाशिक्षक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील उच्च कला शिक्षण समृद्ध करणारे ग्रामीण भागातील प्रसिद्ध सप्तपुट ललित कला भवन, खिरोदा येथील संस्थापक प्राचार्य चित्र शिल्पकार मनोहर चौधरी(गुरुजी), निसर्ग चित्रकार प्राचार्य सी.एन.पाटील,निसर्ग चित्रकार प्रा.गुलजार गवळी,भारतातील एक हजारावर लेण्यांचा अभ्यास केलेले यक्षयात्री प्रा. प्रकाश तांबटकर तसेच शालेय कला शिक्षणातील दिग्गज कलाशिक्षक स्व.पी.जी.कुमावत (नशिराबाद)एन.डी.सपकाळे(मांडळ),श्री.एल.झेड.कोल्हे (जळगाव),स्व.पी.एस.जोशी (गणपुर),स्व.ए.बी.नागपुरे (चोपडा), श्री.भास्कर अढळकर (एरंडोल),स्व.सुहास चौधरी (जळगाव) श्री.आर.टी.पवार (लासूर), स्व.पी.व्ही पाटील (गोरगावले), स्व.रविराज कोळी (पाचोरा),स्व.डि.ओ. शेलकर (अडावद),स्व.राजेंद्र बेंडाळे (पिंपळगाव खुर्द) चित्रकार स्व.वसंत वानखेडे (गोरेगाव), “गुरुवंदना” श्री.राजेंद्र जावळे (भुसावळ) यांच्यासह भगिनी मंडळाच्या अध्यक्षा,महाराष्ट्र शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त स्व.डॉ.सुशीलाबेन शाह, स्व.इंदुबाई ओंकार नेमाडे(जळगाव) स्व.पुष्पाबाई प्रताप पाटील(गोरगावले), स्व.रज्जाक महम्मद पटेल (तोरणमाळ) यांच्या नावाने हे पुरस्कार आहेत. या पुरस्कारासाठी कलाध्यापनातील विविधता, फलकलेखनरेखनातील वेगळेपण व सातत्य,शासकीय रेखाकला परीक्षा, बालचित्रकला स्पर्धा, ऊर्जा,सामाजिक वनीकरण आदी शासनाच्या चित्रकला स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा सहभाग व मिळवलेली बक्षिसे,शाळेची सजावट, कला विषयक जनजागृती, समाज प्रबोधनात्मक चित्रनिर्मिती, तज्ञ मार्गदर्शक, हस्तलिखिते,चर्चासत्रे, वैयक्तिक प्रदर्शने, सेवांतर्गत वाढविलेली गुणवत्ता वा शिक्षण, कलाक्षेत्राकडे वळविलेले विद्यार्थी इ. निकष लक्षात घेतलेले आहेत. राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श कलाशिक्षक श्री.मोहन भोजपुरे (अकोला) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या १० कला तज्ञांच्या समितीने तीन महिन्यांपासून संशोधन केलेले आहे. किमान वीस वर्षे कलाध्यापन असलेल्या कला शिक्षकांना उपक्रमशील कलाशिक्षक राज्य पुरस्कार ₹११०००/- चे एकूण दहा तर किमान दहा वर्षे कलाध्यापन असलेल्या कला शिक्षकांना उपक्रमशील कलाशिक्षक प्रेरणा राज्य पुरस्कार ₹५५००/- एकूण ११ आणि ललित कलांमध्ये सक्रिय असलेल्या एका कलाशिक्षकाला चित्रकार स्व.वसंत वानखेडे (जळगांव)यांच्या नावाने ₹.५५००/-असे एकूण २२ पुरस्कार आहेत. हे पुरस्कार महाराष्ट्रातील कला शिक्षकांसाठी असून मुंबई,कोकण,पुणे, कोल्हापूर,सोलापूर,औरंगाबाद,नाशिक, अमरावती,नागपूर अशा नऊ विभागातून निवडली असून अनुदानित,विनाअनुदानित, नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय आदिवासी आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, अस्थिव्यंग,मूकबधिर अशा शाळांमधून कलाशिक्षक व कला शिक्षिका यांचा प्राधान्याने विचार केलेला आहे.
या सोहळ्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ,जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड,जळगाव, पु.ना. गाडगीळ अँड सन्स,जळगाव यांनी अनमोल सहकार्य केलेले आहे. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेच्या अध्यक्षा सौ पूनमबेन आशिषलाल गुजराथी,सहसचिव सौ.अश्विनीबेन प्रसन्न लाल गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या नेतृत्वात उपक्रम समन्वयक उपप्राचार्य प्रा.आशिष गुजराथी,उपक्रमप्रमुख प्रा.सुनील बारी तसेच अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघ जळगाव,चोपडा तालुका शै.कलाशिक्षक संघ यांनी केलेले आहे.स्पर्धेच्या यशस्विततेसाठी प्रा. विनोद पाटील,प्रा.संजय नेवे,श्री.भगवान बारी,श्री.अतुल अडावदकर,श्री.प्रवीण मानकरी व भगिनी मंडळाचे सर्व कर्मचारी प्रयत्न करीत आहे. या अभिनव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शासनाने नव्याने जारी केलेली कोवीड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाईल असे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.



