महाराष्ट्र
जिल्हा सरचिटणीस म्हणून विशाल शेषराव पाटील यांची नियुक्ती
जामनेर (ईश्वर चौधरी) जळगाव जिल्ह्याचे तथा जामनेर तालुक्याचे नेते संजय गरुड व जामनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्गर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाने यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस तथा जामनेर तालुका निरीक्षकपदी विशाल एस पाटील यांची निवड करण्यात आली.
विशाल पाटील यांनी सांगितले की, मी विद्यार्थी काँग्रेस जामनेर तालुका अध्यक्ष असताना पाच पर्षे जामनेर तालुक्यातील तमाम विद्यार्थी मुला मुलींची मदत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून करत आलो तरी आता जिल्हा पातळीवर गेल्यावर मोठा बळ आणि ताकद ही भेटणार असून अजुन जोमाने आणि नवीन उत्साहाने काम करेल, असे त्यांनी बोलतांना सांगितले.