नेहरू युवा केंद्र आणि के.वाय.के.एम फाउंडेशनमार्फत कोरोना जनजागृती मोहीम
मास्क, सॅनिटायझर वाटप करून नियमांचे पालन करण्यासाठी शपथ
धुळे (प्रतिनिधी) जगावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या स्थितीत जरी कमी झाला असला तरी देखील तो संसर्गजन्य विषाणू असल्या कारणाने त्यास आळा घालण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “कोरोना जनजागृती मोहीम” अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी अशोककुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अभियानाचा दुसरा टप्पा जुने धुळे येथील सुपडू आप्पा कॉलनीतील सावता माळी शाळेजवळ पार पडला. यात संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क वापरण्याचे महत्व पटवून देण्यात आले तसेच, योग्य मास्क वापरावयाची पध्दत शिकविण्यात आली. त्याचबरोबर स्वयंसेविका ज्ञानेश्वरी बिडवे यांनी साबण वाटप करून कशाप्रकारे ३० सेकंड हात स्वच्छ धुवायला हवेत याचे प्रात्यक्षिक करवून घेतले. तर स्वयंसेविका दिव्या साळवे यांनी सॅनिटायझरचे वाटप करून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नियमितपणे नियम पालन करण्याची शपथ दिली. यावेळी महिला, पुरुष आणि बाल वर्ग उपस्थित होते. माझ्या परिवाराचे संरक्षण माझी जबादारी असल्याने मी कोरोना रोखण्यासाठी प्रामाणिकपणे नियमांचे पालन करून कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन नागरिकांतर्फे देण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनिश वाडेकर, संस्थापक सचिव कल्पेश बोरसे,संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य जागृती मोगरे तसेच स्वयंसेवक दिव्या साळवे, कल्याणी मोरे, ज्ञानेश्वरी बिडवे, साक्षी जाधव, राखी बडगुजर, प्रियंका विसपुते, भाग्यश्री भावसार, गौतमी कुलकर्णी, प्रियंका राजपूत, स्नेहा बडगुजर, हर्षदा बडगुजर, दिव्या गवळी, देवयानी वाघ, अविनाश पाटील, तुषार देसले, प्रसाद महाले, योगेश मोरे, निलेश तेलंन, अश्वघोष पवार, गणेश शेजुळ , गोपाल बडगुजर, सुकदेव बडगुजर आदी उपस्थित होते.