स्वर्गीय नानासाहेब पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन
धुळे (प्रतिनिधी) आज डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय धुळे येथे स्वर्गीय नानासाहेब उत्तमरावजी पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “राजकारणातील आदर्श स्वर्गीय नानासाहेब उत्तमरावजी पाटील” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब महेंद्रजी निळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव शशिकांतजी पाटील उपस्थित होते .
प्रमुख वक्ते प्रकाश पाठक होते. आपल्या भाषणामध्ये त्यांनी नानासाहेब उत्तमरावजी पाटील यांचा कायद्याचा अभ्यास धुळेकरांना उपलब्ध व्हावा याच्या साठी केलेला प्रयत्न त्यातून निर्माण झालेले डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय धुळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. नानासाहेबांनी राजकारण करताना समाजकारण हे डोळ्यासमोर ठेवूनच केले. नानासाहेबांनी पद ,प्रतिष्ठान आणि प्रसिद्धी साठी कुठेही काम केले नाही. नानासाहेब उत्तमरावजी पाटील यांचे कार्य खरंच थोर स्वरूपाचे होते असे मत प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक अजित दादा पाटील, संचालक नानासाहेब सुधाकरजी जाधव, विजू नाना पाच्छापुरकर, प्रदिप दादा पाटील, डॉ. शिवाजीराव पाटील व मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक या कार्यक्रमास ऑनलाइन च्या माध्यमातून सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ वैभव सबनीस तर संयोजक प्राचार्य डॉ विजय बहिरम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल एल बी अंतिम वर्षाचा विद्यार्थी यश ठाकूर यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय नेहा या विद्यार्थिनीने केला.