अंबरनाथ तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहात महिला प्रशिक्षणाचे आयोजन
अंबरनाथ : तालुक्यातील मांगरूळ येथे कृषि संजिवनि सप्ताह दीनानिमित्त महिला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा माळी,मंकृअ यांनी करून सप्ताहाचे महत्व विशद केले.
भाग्यश्री पाटील, कृषि सहाय्यक यांनी जमिन आरोग्यपत्रिका याबाबत तर केव्हिके-शास्त्रज्ञ रिषभ पाटील नागांव यांनी गांडुळ युनिट व त्याचे फायदे मार्गदर्शन केले. राहूल म्हसदे (आत्मा) यांनी PMFME प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याबाबत उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी विठ्ठल बांबळे यांनी महिलांचे कृषि क्षेत्रातील योगदान व कृषी योजना, तसेच बाळासाहेब माने, माती परिक्षण प्रयोगशाळा ठाणे यांनी खतांचा संतुलीत वापर व बचत याविषयी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात महिलांना आत्मा अंतर्गत पौष्टिक आहार भाजीपाला मिनिकीट वाटप करण्यात आले केले. या कार्यक्रमास मांगरूळ गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सीआरपी महिला शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वाती कु-हाडे कृषि सहाय्यक व आभार दिपक इंगोले यांनी केले.